apply now
select-lang
apply now
 

वैयक्तिक कर्जाच्या हप्त्यांचे गणक

आपण आपल्या स्वप्नातील ठिकाणी जाण्यास ईच्छूक आहात परंतु पैशांच्या कमतरतेमुळे त्यात बाधा येत आहे का? आयसीआयसीआय बँक वैयक्तिक कर्ज येथे, आम्ही आपल्याला गरज असलेल्या सुट्टयांवर जाणे किंवा खर्चाची परवा न करता घराचे नुतनीकरण करणे शक्य करतो. आम्ही याची खात्री करतो की कर्जासाठी अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया आपल्यासाठी एकसंध बनविली गेली आहे. खासकरुन आपल्या मदतीसाठी आम्ही वैयक्तिक कर्ज हप्त्यांचे गणक आणले आहे.

हे सर्वसमावेशक वैयक्तिक कर्ज हप्त्यांचे गणक आपली वैयक्तिक कर्जाच्या अर्जाची प्रक्रिया सोपी आणि पारदर्शक बनविण्यासाठी बनविले गेले आहे. आपल्याला फक्त खाली नमूद केल्याप्रमाणे काही मूलभुत माहिती पुरवावी लागेलः

  • कर्जाची रक्कम- आपण घेण्याची अपेक्षा करत असलेल्या कर्जाच्या रकमेवर पोहोचण्यासाठी स्लाईडर ला हलवा
  • व्याज दर- व्याज दर 10.5* प्रति वर्षापासून चालू होतात, आपण हे न बदलता सोडू शकता कारण हप्त्याचे गणक आपोआपच लागू हप्त्यांची बेरीज करेल.
  • कर्जाचा कालावधी- हप्त्याची रक्कम बदलण्यासाठी महिन्यांची संख्या बदलता येईल. जितका कालावधी जास्त, तितका मासिक हप्ता कमी.

 

एवढेच! आपण निवड केलेल्या माहितीप्रमाणे आपण भरण्यायोग्य हप्त्याची रक्कम पाहू शकता.

  • आयसीआयसीआय बँकेकडून वैयक्तिक कर्ज घ्या आणि एक उत्तम आर्थिक निर्णय घ्या.
  • आता एक अविस्मरणीय अशी सुट्टी घालविणे किंवा एखादी वस्तू खरेदी करणे आपल्या आवाक्यापलीकडे नाही.
  • आपले भरण्यायोग्य हप्ते अचूक माहित करुन घेण्यासाठी वैयक्तिक कर्ज हप्त्यांचे गणक, आकर्षक व्याजदर आणि जलद कर्ज मंजूरी यासारख्या वैशिष्ठ्यांसह आपल्या स्वप्नांना वस्तुस्थितीत उतरवा, फक्त आयसीआयसीआय बँक वैयक्तिक कर्जांसोबत.

वैयक्तिक कर्ज ईएमआय म्हणजे काय?

ईएमआय म्हणजे ‘ईक्वेटेड मंथली इंस्टालमेंट’ किंवा आपण अमूक रकमेचे वैयक्तिक कर्ज अमूक कालावधीसाठी घेतलेले असल्यास आपल्याला दर महिन्यास भरावी लागणारी रक्कम. ईएमआय ची गणना 3 मुख्य गोष्टींवर अवलंबून असतेः

  • वैयक्तिक कर्जाची रक्कम- आपण घेत असलेल्या कर्जाचे रुपयातील मूल्य
  • वैयक्तिक कर्जाचा व्याज दर- वैयक्तिक कर्जाचाठी बँक घेत असलेला व्याज दर
  • वैयक्तिक कर्जाचा कालावधी- आपण वैयक्तिक कर्ज घेत असलेला कालावधी

*सूचना ऑनलाईन पडताळणी झाल्यावर आणि अंतिम ऑफर ला मान्यता मिळाल्यावर निवडक ग्राहकांसाठी लागू

डिस्क्लेमर


आयसीआयसीआय बँक म. हा अर्ज आपल्या सुविधेसाठी आणि वैयक्तिक माहितीसाठी ठेवते, दर्शक इक्वेटेड मंथली इंस्टॉलमेंट चा अंदाज चे शिक्षण आणि संचारण ही आयसीआयसीआय बँकेचे कोणत्याही प्रकारचे उत्पादन/सुविधा प्राप्त करण्यासाठीची कुठलीही ऑफर, आमंत्रण किंवा प्रार्थना विनंती नव्हे आणि कोणत्याही प्रकारचे हक्क किंवा बांधिलकी निर्माण करण्यासाठी नाहीत. कृपया लक्षात घ्या की या अर्जाद्वारे गुणांकित ईएमआय हा त्यापुढील मोठ्या संख्येशी गोळाबेरीज करण्यात आलेला आहे. याशिवाय, गुणांकित ईएमआय हा पूर्णपणे आपण प्रविष्ट केलेल्या माहितीवर अवलंबून आहे आणि आयसीआयसीआय बँकेने स्वतः किंवा तिसर्‍या पक्षासोबत मिळून सुरु केलेल्या कोणत्याही सूट, स्किम किंवा इतर विक्रीवाढ कार्यक्रमामुळे येणार्‍या बदलांना विचारात घेतलेले नाही.


या अर्जामधे समाविष्ट असलेल्या माहितीवर किंवा तिच्या पूर्णतेवर कोणत्याही उद्देशासाठी विसंबून राहता येत नाही. यात असणारी माहिती ही अद्ययावत करण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी, पुनरावलोकनासाठी, पडताळणीसाठी आणि दुरुस्तीसाठी अधीन राहून असू शकते आणि अशा माहितीत बराच बदल होऊ शकतो. या अर्जातून पुरविलेल्या कोणत्याही माहितीच्या अचूकतेबाबत, पूर्णतेबाबत किंवा अचूक क्रमाबाबत आयसीआयसीआय बँक कोणतीही जबाबदारी स्विकारत नाही.


यात समाविष्ट असलेली बौध्दिक संपत्ती ही पूर्णपणे आयसीआयसीआय बँकेच्या मालकीची आहे आणि अर्जाची व त्यामधील माहितीची कोणत्याही प्रकारे पुनरुत्पादन, प्रसारण, नक्कल, प्रकटीकरण, फेरबदल आणि/किंवा प्रकाशन करण्यास सक्त मनाई आहे. आयसीआयसीआय बँक आपण घेतलेल्या सुविधांमुळे आपल्या अपेक्षा, ध्येय आणि गरजा पूर्ण होतील याचे प्रतिनिधित्व करत नाही किंवा आपल्याला कोणतेही आश्वासन देत नाही.


ईएमआय ची रक्कम ही रक्कम मिळण्याच्या तारखेवर आणि डिसबर्स तारखेच्या आणि पहिल्या ईएमआय च्या मधील कालावधीवर अवलंबून कमी अधिक होईल.